प्रतिनिधी : सुर्यकांत होनप
अर्जुननगर: ग्रामपंचायत चे विलगीकरण कक्ष जोमात.अर्जुननगर ग्रामपंचायतीने गावातील तरुणांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून वाढत्या कोरणा रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी तहसीलदार समीर माने करमाळा पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी मा श्रीकांत खरात साहेब यांचे सूचनेनुसार सरपंच सौ अश्विनी प्रकाश थोरात यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत व लोकसहभागातून गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करून गावातील कोरोणा पॉझिटिव परंतु सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तिथे दाखल केले.
सदर विलगीकरण कक्षात दाखल रूग्णांना आवश्यक असणारे सर्व साहित्य खरेदी करून व तीव्र लक्षने असलेल्यास रुग्णालय उपचारासाठी मदत करण्यास आजपर्यंत अंदाजे एक लक्ष रुपये लोकवर्गणी जमा केली आहे सदर लोकवर्गणीतून विलगीकरण कक्षासाठी आवश्यक लागणारे सर्व साहित्य खरेदी केले तसेच नाश्त्यासाठी रोज सकाळी दोन अंडी व शिरा दिला जात असून संध्याकाळी आयुर्वेदिक काढा दिला जात आहे प्रत्येक रुग्णाची दैनंदिन तपासणी अशा सेविका सौ प्रेमा भोगे यांचेकडून केली जाते तसेच गावातील कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी गावातील विविध तरुणांनी मोफत मास्क वाटप केले.
ग्रामपंचायत मार्फत हँडवॉश वाटप केले या विलगीकरन कक्षासाठी सरपंच प्रतिनिधी प्रकाश थोरात नितीन भोगे सर नाना रोकडे स्वप्निल घाडगे पीएसआय शिवाजी भोगे सागर शेळके हे मोठ्या प्रमाणात कष्ट घेत आहेत त्यामुळे गावातील वाढती रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाल्याचे ग्रामसेवक मनोज लटके यांनी सांगितले.
सदर विलगीकरण कक्षासाठी साडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विलास शहा समुदाय आरोग्य अधिकारी पल्लवी बडे मंडळ अधिकारी सादिक काझी विस्तार अधिकारी आदिनाथ आदलिंगे साहेब माजी सरपंच अनिल थोरात पवार तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील नवनाथ पवार सरपंच अश्विनी थोरात उपसरपंच अभिमान धुमाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ ढवळे भाऊसाहेब आडसुळ ज्ञानेश्वर ननवरे कोतवाल लाला आडगळे संगणक चालक केशव घाडगे हे मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत.
सर्व ग्रामस्थांनी लवकरच गावातून कोरोना हद्दपार करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे.

