shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काव्य: "आमुचा प्रवास"

काव्य: आमुचा प्रवास


स्वप्न पाहणारे आज त्रस्त झाले..!
महागाईत बाजारातल्या मरणे स्वस्त झाले...!!

कष्टकर्यांना  दिसेना आज रोटी येथे..!
जगण्याची उमेद का होते छोटी येथे..!!

आपुलकीने आप्तांना भेटणे ना झाले..!
येथे नशिबी आता झुरणेच आले..!!

कोठून कोठे आमुचा प्रवास हा झाला..!
जगण्याचा नुसताच हा भास का झाला..!!

जगताना भावनांचे पाषाण खूप झाले..!
मरणानंतरचे सरणे आज कठीण झाले..!!


रचना-
दीपक महाले,
शिरूर कासार .
मो.9823384909.
close