shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर - रिलायन्स पेट्रोल पंपाने घेतला पुढाकार ..!कोविड संदर्भात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकाना ३० जून पर्यंत मोफत डिझेल...!!


संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
संगमनेर-पुणे रोडवरील चंदनापुरी येथील रिलायन्स पेट्रोल पंप कडून रुग्णवाहिकाना १५ मे, ते ३०,जून पर्यंत मोफत डिझेल वाटप करण्यात येणार आहे.

याची सुरुवात संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. तर या वेळेस उपस्थित असलेले मान्यवर अहमदनगर जिल्हा सेल्स मॅनेजर जय प्रकाश, तसेच रिलायन्स पंपाचे संचालक उत्तम चौधरी, चंदनापुरी गावचे सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, ग्रामसेवक दुर्गुडे मॅडम व रिलायन्स पंपाचे सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता.

ही सेवा १५ मे पासून ३० जून पर्यंत रिलायन्स पंप तर्फे सुरुवात करण्यात आली आहे. ही सेवा सदर , फोर्स फुल सर्विस कोविंड, ऑक्सिजन वाहतूक, लस वाहतूक,पेशंट वाहतूक ॲम्बुलन्स या सारख्या सर्व कोविड मध्ये वापरण्यात येणाऱ्या सेवांसाठी रिलायन्स पेट्रोल पंप १५मे ते ३०जून पर्यंत मोफत पेट्रोल वाटप करणार आहे.
close