नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील खांडके गावात मेहेकरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कोरोना तपासणी रिपिड ॲटिजन टेस्ट चा कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पसाठी मेहेकरी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी तागड, गायकवाड मॅडम, खांडके गावचे सरपंच पोपटराव चेमटे, उपसरपंच जितेंद्र ठोंबे, ग्रामसेवक गर्जे भाऊसाहेब, आशा वर्कर नीलम पवार, अंगणवाड सेविका चंदा आढागळे, सावित्राबाई कांबळे, मनीषा टांगळ, आशा चेमटे, हा कँप यशस्वीतेसाठी आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने कोरोनाच्या टेस्टसाठी आले होते. कोरोना. तपासणी झाल्यानंतर खांडके गावचे सरपंच पोपटराव चेमटे कोरोना हा राक्षस आहे.आपण सर्वजण आपल्या स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या विनाकारण फिरू नका अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. विना मास्क गावा मध्ये कोणीही प्रवेश करू नये अशी सर्वांना विनंती केली.

