shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कलापंढरी संस्थेच्यावतीने आरोग्य साहित्याचे वितरण...! कोरोना काळात कलापंढरीचा मदतीचा हात..!


नांदेड- सद्याची कोरोना संसर्गाची स्थीती पाहता कलापंढरी संस्थेने क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने लातूर व नांदेड जिल्ह्यातील संस्था कार्य करीत असलेल्या ४० गावांशी संलग्नीत प्राथमीक आरोग्य केंद्र,प्राथमीक आरोग्य उपकेंद्र आणि जिल्हापरीषद अंतर्गत असलेल्या सिसिसी कोविड येथे कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी.पी.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य साहीत्याचे वाटप करण्यात येत आहे.कलापंढरी सामाजीक संस्था  पानगाव( लातूर) ही संस्था मागील ३3 वर्षापासून बालहक्क सुरक्षितता, महिला सक्षमीकरण व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर लातूर जिल्ह्यात कार्य करीत आहे.

ता. 10 मे रोजी मंगळवारी उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथील  कोविड सेंटर यांच्याकडे आरोग्य स्वच्छता साहित्य (सॅनिटायझर, मास्क, ग्लोज, dettol साबण व हँड वॉश, थर्मल गन) संस्थेचे समुदाय संघटक सौ. सरस्वती येमुलवाड व सौ. छाया सोन कांबळे यांनी सुपूर्त केले. याप्रसंगी  डॉ. जयश्री संगेवार मॅडम, कार्यालयीन अधीक्षक विठ्ठल चप्पलवार, श्रीवास्तव सर (जनसंपर्क अधिकारी, रक्तपेढी) डॉ. सुनील सर, मनीषा गायकवाड व अर्चना राठोड स्टाफ नर्स  व कोविड सेंटर चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

तसेच सावरगाव सब सेंटर येथे वरील प्रमाणे साहित्य वाटप केले त्यासाठी डॉ गरुडकर व संपूर्ण स्टाफ यांनी सहकार्य केले.
close