shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गंभीर स्वरूपाच्या मारहाण प्रकरणात तीनही आरोपीचा जामीन उच्च न्यायालयात मंजूर....!



औरंगाबाद,ता 27 : पोलिस स्टेशन औंढा नागनाथ येथे दाखल झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणातील आरोपी सखाराम मरिबा नागरे, भिकाजी मरिबा नागरे, बाळू भिकाजी नागरे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे मा. न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी मंजूर केला आहे.


औंढा नागनाथ येथील एकाच्या फिर्यादी वरून आरोपीच्या विरोधात औंढा नागनाथ पोलिस स्टेशन येथे भा.द.वी. कलम 326, 447, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे की आरोपीने फिर्यादीला अतिशय गंभीर स्वरुपाचा मार देऊन हात व पाय फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली आहे. सदर गुन्ह्यात तीनही आरोपींना औंढा नागनाथ पोलिसांनी अटक केली होती व त्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय, वसमत यांनी फेटाळला होता. 

सदर गुन्ह्यात तीनीही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड.डी. यु. कांबळे यांच्या मार्फत जामीन करता फौजदारी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज मंजूर करताना माननीय न्यायमूर्तींनी असे म्हंटले आहे की, कोणी एकही व्यकतीते घडलेली घटना पहिली नाही आणि त्यामुळे प्रत्येक साक्षीदारांची साक्ष एकसारखी आहे. साक्षीदार असे सांगतात आम्ही फिर्यादीला जखमी अवस्थेत पाहिले आणि विचारपूस चौकशी केली.

त्यामुळे फक्त फिर्यादी स्वतः एकटाच घडलेल्या घटनेचा साक्षीदार आहे आणि दुसरा साक्षीपुरावा म्हंटले तर मेडिकल पेपर व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पुरावा नाही. मेडिकल पेपर मधे असे दिसून येते की, फिर्यादी फॅकचर झालेल्या अवस्थेत दिसून येतो आणि पोलिसांनी आरोपी कडून तीन काठ्या जप्त केल्या आहेत. आरोपींनी बराच वेळ जेलमध्ये घालविला आहे त्यामुळे त्यांना जास्त वेळ जेल मधे ठेवण्याची आवश्यकता दिसून येत नाही.
या प्रकरणात आरोपी तर्फे ॲड.डी. यू.कांबळे हिंगोली यांनी काम पाहिले. ॲड.अतुल कांबळे औरंगाबाद आणि ॲड. जी. डी. अंगद यांनी सहाय्य केले.
close