shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याला आदर्श कोरोना नियोजनाचा पॅटर्न देणारे आ.निलेश लंके यांना "कोरोना आपत्ती नियोजन मंत्री " करा..!


राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांची मागणी..!

प्रतिनिधी । मोहन शेगर : 
सोनई :- कोरोनाच्या या भयानक महामारीत घाबरून घरी न बसता  या लढाईला रूग्णसेवेची संधी मानुन दिवसराञ फक्त जनतेच्या प्रती कर्तव्यातुन आपला पारनेर  मतदारसंघ असो किंवा अहमदनगर जिल्हातील बेड विना आडलेले कुठलेही रूग्ण असो.. त्यांच्या समोर फक्त एकच आशेचे नाव दिसते ते म्हणजे शरद पवार साहेबांचे दुसरे आबा स्व.आर.आर.पाटील म्हणजे पारनेरचे लोकनेते आ.निलेश लंके...! 

गेल्या वर्षी जागतिक स्तरावर कोरोना महामारी आली असताना प्रथमच पारनेर तालुक्यातील डझनभर इच्छुकांना डावलुन एक सर्वसामान्य घरातील हा तरूण आर्थिक काही पाठबळ नसताना केवळ तालुक्यातील सर्वसामान्य युवकांच्या व जनतेच्या आशिर्वादावर आमदार झाला. 

यानंतर तीन महिन्यातच हे कोरोना महामारी आली.नविनच सरकार स्थापन झालेले आमदार नविन निधी नाही. गोर गरीबांच्या डोळयातील अश्रु शांत बसु देतील ते निलेश लंके कसले...!तालुक्यातील सर्व तरूण कार्यकर्त्यांना आवाहन करत कोविड आपत्ती निवारण्यासाठी एकञ आणत टिम मधील  प्रत्येकाला वेगवेगळे नियोजन दिले. सर्व क्षेञातील दानशुर लोकांना मदतीचे आवाहन करत पारनेर तालुक्यातील नगर कल्याण रोडवरील भाळवणी येथे 1100 बेडचे शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले.

यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंञी नाम.अजितदादा पवार यांच्या माध्यमातुन कोविड सेंटरच्या साठी शासकिय मदत मिळवली.आणि पारनेर तालुक्यातील गोरगरीब जनतेला इकडे तिकडे आरोग्य सुविधे अभावी भटंकती करण्याची वेळ येवुच दिली नाही.

कोरोना परिस्थिती नियोजन  काटेकोर नियोजन करणारे निलेश लंके यांनी फार काही मोठी एम.डी ची डिग्री घेतली नाही किंवा परदेशातुन व्यवस्थापन शास्ञ शिकुन आले नाहीत. त्यांच्या बरोबर होती फक्त जिवाला जिव देणारी पारनेर तालुक्यातील जिवाभावाचे कार्यकर्त्याची यंञणा.आणि एक मदतीची भावना दिवसभर स्वतः कोविड सेंटर मध्ये मदतीसाठी थांबुन राञी अपराञी सुद्धा आ.निलेश लंके भाळवणीच्या कोविड सेंटर मध्ये येवुन परिस्थितीची पाहणी करतात.तेथे येणारे रूग्णाला माया ममतेने, प्रेमाने समुपदेशन करतात.शिवाय स्वतः जेवन हाताने वाढवुन खावु घालतात. 

शाकाहारी व मासांहारी जेवन,सकाळी नाष्टा चहा व वेगवेगळया फळाचा ज्युस सुद्धा प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी  मोफत देतात. एक रूपया सुदधा कुठल्याही रूग्णाकडुन घेत नाहीत. याबाबत निलेश लंके म्हणतात मीच जर कोरोनाला घाबरून घरात बसलो असतो तर मला निवडुन दिलेली मायबाप जनतेने कुणाकडे पाहिले असते. माझ काही होवु दया पण माझे लोक इकडे तिकडे कुणाच्या दारात गेलेले मला नाही देखवले जाणार....! त्यांना दिलासा मिळावा म्हणून मी दररोज त्यांच्याबरोबर जेवतो, सर्वांना भेटतो,हेच लोकप्रतिनिधीचे काम आहे.असे ते आवर्जून सांगतात. 

अशा महान विचार घेवुन आलेल्या गरीब घरातील तरूण फक्त लोकसेवा करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावतो अशा लोकप्रतिनिधी मध्ये फार थोडे लोक असतात जे गोर गरीबांचे प्रश्न ऐकुन घेतात अशामध्ये माजी उपमुख्यमंञी स्व.आर.आर.पाटील आबा हे होवुन गेले.तोच आदर्श ठेवत राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना आता दुसरे आबा मिळाले आहेत ते म्हणजे पारनेरचे लोकनेते आमदार निलेश लंके....!

नगर जिल्ह्यातील जनतेसाठी एक देवदूत..!

मला स्वतःला त्यांच्या कोरोनाच्या कामाबाबतीत अनुभव आला असल्याने आ.निलेश लंके तालुक्याबाहेरील कार्यकर्त्याला सुद्धा फोन घेवुन मदत करतात. कोरोना आपत्तीची संधी मानून नियोजनाचे मोठे कार्य करणारे आ.निलेश लंके यांना राष्ट्रवादी काॅग्रेस कडे सध्या माजी मंञी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या मंञीपदावर तात्काळ पवार साहेबांनी वर्णी लावत फक्त "कोरोना आपत्ती नियोजन मंञी" हे खाते तयार करून राज्यात कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी व भविष्यात येणारी आपत्तीसाठी तयारी करण्यासाठी आ.निलेश लंके यांना मंञीपदाची संधी दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार साहेब यांच्याकडे शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांनी केली आहे.

याचा पवार साहेब नक्कीच सकारात्मक विचार करतील हीच सामान्य नागरिकांची ही अपेक्षा..!
close