संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):-
आजी आणि नात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चिंचोली गुरव येथील आजी व नात गाय व शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले असता,नाती चा पाय घसरून नात बंधाऱ्याच्या पाण्यात पडली. व तिला वाचवण्यासाठी आजीही पाण्यात उतरली पण दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला.
भक्ती निलेश आभाळे, वय वर्ष७, व परमिला आभाळे, वय वर्ष ५०, असे आजी व नात यांचे वय होते. अविनाश जाधव यांच्या शेतात गाय व शेळ्या मोकाट सुटल्या म्हणून त्यांना हूसखण्या साठी गेले व त्यांनी बघितले की गाय व शेळ्या मागे कोणीच नाही.
तेव्हा ते शेजारच्या बंधाऱ्या जवळ गेले व त्यांना तेथे पाण्यावर चपला तरंगतानी दिसल्या तेव्हा त्यांनी ग्रामस्थांना कळवले.त्यानतर आजी व नात यांना बाहेर काढण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

