shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांच्या मागणीला यश..!

लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांच्या मागणीला यश..!!

प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत व त्यातील अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता लागत आहे.

ऑक्सिजनची प्रचंड मागणी वाढल्यामुळे राज्यामध्ये अचानक ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला परिणामी शिरूर तालुक्यातील रुग्णांनाही ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी वणवण करावी लागली. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी..

शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांनी शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सिस्टीम बसवण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. श्री अजित दादा पवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख साहेब यांच्याकडे केली होती.

सदर मागणी मान्य करत शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात Medical Grade Oxygen Concentrator System (500 LPM) बसवण्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आदरणीय अजितदादा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना पवार यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले आहे.
close