shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चक्क मारहाणीचा असा प्रकार, पुरोगामी महाराष्ट्रात घडतो ..! पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांचं टोळकं, गुरा-ढोरावाणी माणसाला झोडतो... !!


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - गेल्या दोन तीन दिवसांपासून जालन्यातील पोलिसांकरवी होत असलेल्या अमानुष मारहाणीची व्हिडिओ क्लिप व्हाॅटसॲप/फेसबुकवर व्हायरल होत आहे,यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत पोलिस अधिकारी देखील काठी तुटेपर्येंत शिवाजी नारलवले या ग्रहस्थाला अमाणूषपणे मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे.



असा काय त्याचा गुन्हा आणि पोलिसांचा हा कसला व कोणता अधिकार ?

आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो ही थोर संतांची भूमी आहे. मात्र येथे ही राक्षसी व अमानवी प्रवृत्ती शेवटी आलीच कशी ?, जगाच्या पाठीवर आपला लोकशाही प्रदान असलेला असा एकमेव देश आहे.मात्र यावरुन असे वाटत नाही की खरोखरच देशात आता लोकशाही उरली आहे..?

मागच्यावेळी डोनाल्ड ट्रम्प सरकार असताना अमेरेकेतील एका पोलिस अधिका-याने एका कृष्णवर्णिय मानसाच्या मानेवर पाय देऊन भररस्त्यावर त्याचा जीव घेतल्याचा व्हिडिओ देखील जगभर व्हायरल झाला होता.‌ त्याचे जगभर पडसाद उमटून शेवटी अमिरेकेतील जागरुक नागरीकांच्या वैचारीक परिपक्वतेच्या निर्णयामुळे ट्रम्स सरकारला लाथाडले गेले.

आता आपल्या भारतातही काही पोलिसांकरवी असेच गैरकृत्य घडताना बघावयास मिळत आहेत.यावर भारतीय नागरीक कधी जागे होणार ? हा विषय महत्वाचा आहे.सध्या राज्यात व देशात ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना काही पोलिसांच्या टोळक्याकडून होत असलेली अमानुष मारहाणीचा निषेध नोंदवावा तीतका आता कमीच आहे.

आता यामध्ये सर्वच पोलिस असे करतात असे आम्हांस मुळीच म्हणायचे नाही, काहि पोलीस अधिकारी व कर्मचारी असे ही आहेत की त्यांचे आदर्श वत कामामुळे सर्वांची छाती फुगते असेही  आदर्श काम काहिंचे आहेच.त्याबद्दल शंका नाही. 

मात्र जे कोणी अशा प्रकारचे वर्तणूक करतात त्यांना याबाबत कठोर शासन झाले पाहिजे व शासन कर्त्यांनी वेळीच वेसन लावले पाहिजे अन्यथा जनमानसाचा सरकार आणि पोलिसांवरचा विश्वास उडाल्यावाचुन राहणार नाही तथा हे लोकशाहीस मोठे घातक ठरु शकते. यामुळे सदरील प्रकरणी शासनाने अशा मुजोर आणि बेजबाबदार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ योग्य शासन करावे तथा याची माहिती देखील तीतक्याच तत्पर्तेने प्रसार माध्यमांत द्यावी,जेणे करुन राज्यात/देशात कायद्याचं राज्य असल्याचा संदेश जाईल तथा पोलिस खात्याबरोबरच शासनाची देखील मलिन झालेल्या प्रतिमेस उजाळा मिळू शकेल हे मात्र खरे...!
close