shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाच्या भितीने आणि लॉकडाऊन मध्ये शहरात नियमांचे पालन...!

प्रतिनिधी ।  संतोष वायकर :
 
करमाळा ( दि .२०) : सध्या संपूर्ण सोलापुर जिल्ह्यामध्ये तसेच करमाळा तालुका व शहरामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ( Break The Chain )नागरिक शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करताना दिसुन येत आहेत . 

संपूर्ण शहर व तालुक्यामध्ये कोरोना महामारीमुळे भितीचे वातावरण असल्याने सर्वजण शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करताना दिसतात . सर्व खाजगी बॅका जि.प., पंचायत समिती कार्यालये तहसील कार्यालय महा ई सेवा केंद्र. कृषि उत्पन बाजार समिती इ . सर्व क्षेत्रा मध्ये फक्त अत्यावशक सेवा कामे चालु आहेत . कोरोना रोगामुळे लोकांच्या मनात खूप प्रमाणात भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शहरात रस्त्यावर सर्वत्र  शुकशुकाट पाहावयास मिळतो.

 सर्व लोक शासनाचे निर्बंध व अटींचे पालन करताना दिसतात त्यामुळे कोरोना महामारी  कमी होण्यास मदत नक्कीच होत आहे .
लॉकडाऊन मुळे इतर सर्व उद्योग धंदे व्यापारपेठ बाजारपेठ अत्यावशक सेवा सुविधा सोडुन संपूर्णपणे बंद आहेत .त्यामुळे शासनाचे सर्व नियम व अटी चे पालन  होताना पाहावयास मिळते आहे .लोकांच्या मनात अजुनही कोरोना रोगाविषयी भरपूर भितीचे वातावरण पाहावयास मिळते .

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढीच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन  म्हणजेच कडक निर्बंध लागू केलेनंतर जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये गेल्या आठवड्यातील कडक लॉकडाउनचा कालावधी वगळता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज चालू होते . 

या दरम्यान अन्न धान्य पुरवठ्याची साखळी तुटू नये यासाठी भाजीपाला व शेतमालाची आवक 
 नियमीत सुरू होते . बाजार समिती अंतर्गत व्यापारी, हमाल व कर्मचारी यांनी कोरोना नियमांचे पालन करीत कामकाज केले .परंतु कडक निर्बंध व वाहतुक समस्येमुळे शेतमालाची आवक मात्र घटलेली आहे .
close