shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा . मुख्यमंत्री यांना पत्र देऊन अजुनही भिमाबाई आहेत न्यायाच्या प्रतिक्षेत...!!


प्रतिनिधी । संजय वायकर :-

शिरूर (दि .२० ) : पूणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील भिमाबाई (वय ८२ ) यांना आणि त्यांच्या संभाजी भोस या मुलाला त्यांच्याच गावातील कुटुंबा कडून होणारा त्रास या बद्दल त्यांनी मा .मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून न्याय मिळवून देण्यासाठी याचना केली आहे .

भिमाबाई यांनी सांगितले की ,  काही बाबतीत त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्या मागील ९ वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्या नगर येथील त्यांचा मुलगा संभाजी भोस यांच्याकडे सध्या वास्तव्यास आहेत. परंतु त्यांचे स्वतःचे घर निमोणे येथे असून तेथील कुटुंबाने मागील तीन महिन्यापूर्वी त्यांना त्यांच्याच नावे असणारे घरातून बाहेर काढले आहे .
 मुलगा संभाजी भोस बरोबर भिमाबाई भोस


भिमाबाई  व मुलगा संभाजी यांची निमोणे येथील शेतीत दांडगाई शाहीने तेथील कुटुंबाने 
उभे पिक नांगरून नुकसान केले आहे . त्यासाठी त्यांनी मा . मुख्यमंत्री, मा . पोलिस आयुक्त पुणे, मा . जिल्हा पोलिस अधिक्षक पुणे आणि इतर संबंधीत विभागांना पत्रा द्वारे न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केल्याचे भीमाबाई यांनी सांगितले .

कोणालाही त्रास न देता स्वतंत्र विचाराच्या भिमाबाई यांना सध्या त्यांचे स्वतःचे घर तरी परत मिळावे अशी त्यांची माफक इच्छा आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे स्वतःचे घर परत मिळावे म्हणून न्याय मिळण्यासाठी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त  न्यायालयाचे दरवाजेही सध्या बंद आहेत असे भिमाबाई सांगतात.

हताश आणि निराश झालेल्या भिमाबाई मात्र कोठूनतरी न्याय मिळेल म्हणून चिंताग्रस्त होवून आस लावून बसल्या आहेत.
close