shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगडाची राणी फेम कांताबाई सातारकर यांचे त्यांच्या संगमनेर मधील राहत्या घरी निधन..!!


संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):

कांताबाई सातारकर यांचे काल २५/५/२१ रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी विविध भूमिका निभाविणाऱ्या एक उत्तम अभिनेत्री, गायिका, व्यवस्थापक तमाशा क्षेत्रात स्वतःचे नावलौकिक निर्माण केलेल्या  कांताबाई सातारकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी संगमनेर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे.

तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे महाराष्ट्रात लोककला क्षेत्रात विलक्षण योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने २००५ साली तमाशा क्षेत्रातील योग्दनासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईचा सन्मान केला होता.

दिल्ली येथील झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता.

मराठी रंगभूमीवर एका स्त्रीने पुरुषाच्या विविध भूमिका केलेल्या त्या महिला कलावंत, पुरुष कलावंताना लाजवेल अशा भूमिका त्यानी केल्या होत्या. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका हुबेहुबे वठविल्या. त्यांचा संपूर्ण कलाक्षेत्रात नावलौकिक होते. त्यांनी नवव्या वर्षी साताऱ्यात नृत्याची सुरुवात केली होती.

कांताबाईचे संपूर्ण कुटुंब आजही तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. चिरंजीव रघुवीर खेडकर मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे
close