shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकसंख्या नुसार दरेवाडी गावात लसीकरण मोहीम जास्त डोस देऊन राबवावी च्या पाठपुराव्यास अखेर यश...!



प्रतिनिधी : संजय वायकर
 
दरेवाडी : ( दि .२६ ) : दरेवाडी गावाला लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यात यावी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गावातच लसीकरणाचा कॅम्प घेण्यात यावा यासाठी टाकळी उपकेंद्राला मच्छिंद्र बेरड ग्रा. प सदस्य , दरेवाडी,श्री.बाबासाहेब कारंडे ,सदस्य,
ॲड.दीपक बेरड श्री. विक्रम भोगाडे,सदस्य श्री.सुनील बेरड महेश बेरड श्री.प्रकाश गायकवाड श्री. आर्य बेरड यांनी निवेदन दिले होते .
 

लोकसंख्येनुसार दरेवाडीला लसीचा पुरवठा झाला नव्हता. दरेवाडी गावापेक्षा लहान लहान गावांना जास्त लसीचा पुरवठा झाल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दरेवाडी साठी लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते . त्यास यश मिळाले आहे .

गुरुवार दिनांक 27/5/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आलेले आहे .तरी उद्याचे लसीकरण हे गावातील वयवर्ष 60 च्या पुढील जेष्ठ नागरिकांना करिता असेल .तसेच ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेली असतील त्यांना दुसरा डोस देण्यात येईल.

त्यामुळे उद्या 60 वयोगटाच्या पुढील तसेच पहिला डोस घेऊन 84 दिवस झालेल्या नागरिकांनी लसीकरण करिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथे सोबत आधारकार्ड घेवून यावे आणि नाश्ता जेवण करून यावे असे सांगण्यात आले आहे .
close