देवळाली प्रवरा नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोविड सेंटर कडून रुग्णांची अक्षरशः लूट सुरु आहे.
आज दि. १७ मे २०२१ रोजी दुपारी २.१२ वाजता आप्पासाहेब मला सोडवा अशी आर्त हाक देणारा फोन आला..., पलीकडून बोलणारी व्यक्ती ही पाकिस्तान ची नसून देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी फॅक्टरी च्या गजानन वसाहती मधील गरीब कुटुंबातील अतुल रमेश बाविस्कर हे होते.ते म्हणत होते, आप्पासाहेब मला येथून सोडवाहो.., तुमचे फार उपकार होतील... , मी देवळाली प्रवरा येथील शनी मंदिरासमोर असलेल्या कोविड सेंटर मध्ये बुधवार पासून ऍडमिट आहे.., मला रेमडेसीविर इंजेक्शन दिले नाही .., ऑक्सिजन सुद्धा लावले नाही.., तरी सुद्धा ४ दिवसाचे ४० हजार रुपये बिल काढले आहे.., माझेकडे बिल भरायला पैसे नाहीत.., कृपया मला मदत करा.., मला येथून बाहेर काढा..!, असे हृदय पिळवटून टाकणारे शब्द ऐकून या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची किती लूट चालू आहे हे स्पस्ट होते.
आत्तापर्यंत या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची आर्थिक लूट होते हे फक्त ऐकले होते.., आज मात्र प्रत्यक्ष अनुभव आला...!
खूपच धक्कादायक .., एकीकडे कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी कित्येक दानशूर व्यक्ती, संस्था समोर येत असताना कोरोना रुग्णांच्या मढ्यावर बसून खाणारी ही मंडळी हे पाप कुठे फेडणार.., संपूर्ण देवळाली प्रवरा पंचक्रोशीत या कोविड सेंटरची व त्यामधील गलथान कारभाराची आणि नागरिकांना जास्त बिल आकारून कसे लुटले जाते याची चर्चा सुरू आहे, यांनी अक्षरशः कोरोना रुग्णांचा या ठिकाणी धंदा मांडला आहे.., त्यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांनी तात्काळ देवळाली प्रवरा येथील या खाजगी कोविड सेंटरची चौकशी करावी व यामध्ये अडकलेल्या रुग्णांना दिलासा द्यावा. अन्यथा या कोविड सेंटर मध्ये घुसून येथे बिला अभावी अडकलेले रुग्ण आम्ही बाहेर काढू याची नोंद घ्यावी.
तसेच मी या खाजगी कोविड सेंटर चालकाला तात्काळ हे कोविड सेंटर शासनाच्या ताब्यात देऊन *चले जाव* ची सूचना करीत असून त्यांनी आमची सूचना मानली नाही तर देवळाली प्रवरा मध्ये तीव्र स्वरूपाचे *चले जाव* आंदोलन उभारले जाईल याची नोंद घ्यावी.
आप्पासाहेब ढुस,
देवळाली प्रवरा.

