shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा च्या कोविड सेंटरला मुख्याध्यापक संघाचा सहारा..!

देवळाली प्रवरा च्या कोविड सेंटरला मुख्याध्यापक संघाचा सहारा..!
देवळाली प्रवरा - दि. १७ मे 
देवळाली प्रवरा च्या कोविड सेंटरला मुख्याध्यापक संघाने आज मदतीचा हात पुढे करून सहारा दिला. 

सोसिएल मीडिया द्वारे झालेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहुरी तालुका मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे वतीने देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला आज चार स्टँड फॅन व चार ऑक्सि मीटर भेट देणेत आले. 

प्रसंगी राहुरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सूर्यवंशी साहेब, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष इले सर, तालुका गणित विज्ञान शिक्षक संघाचे अध्यक्ष सुहास महाजन, देवळाली प्रवरा राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, तलाठी साळवे, अमजद इनामदार व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राहुरी तालुका मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे आभार मानले.
close