प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- सध्या देशावर कोरोनाच्या संक्रमनाचे संकट आल्याने जो तो आपल्या परिने कोरोना संक्रमनातील पिडितांना मदतीचा हातभार लावत आहे.
बीड जिल्हा ऊसत़ोड कामगार विकास मंडळ केज संचालित साने गुरुजी निवासी विद्यालय केजच्या वतिने सहायक समाज कल्याण आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या प्रेरणेने व कराड दापत्य यांची कन्या कु. साक्षी कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन केज येथे सुरु असलेल्या कोविड सेंटर वर उपचार घेतसलेलया करिता दि. 12 ते 18 मे पर्यंत मोफत अन्नछत्र वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते श्री पशुपतीनाथ दांगट यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी पशुपतीनाथ दांगट यांनी कविताताई व अॅड.उद्धवराव कराड हे दापत्य नेहमीच शैक्षणिक कार्यात विविध प्रयोग करुन शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नाव लौकीक प्राप्त केलेले आहे सामाजिक सेवेत सुद्धा त्यांचे मोटे योगदान आहे गेल्या एक वर्षापासुन हे दापत्य सतत कोरोना सारख्या महामिरित कार्य करत आहे.
गेल्या लॉकडाऊन मध्ये दिड महिना 40 कुटुंबाना ऊसत़ोड मजुरांना येथे निवास व भोजन व्यवस्था केली होती व त्यांची साड़ी चोळी भेट देऊन अनोखी अशी विधाई केली होती. असेघ कार्य नेहमी करावे अशा या प्रसंगी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारु डॉ.आठवले साहेब, उद्धवराव कराड, डॉ.कविताताई कराड मॅडम, डॉ.चोरे, समिर देशपांडे,सानप सर नागरगोजे मॅडम, चाटे सर, घुले सर, व साने गुरुजी निवासी विद्यालय परिवारातील सर्व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.

