shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचे कोविड केंद्रात स्वर घुमले..!!


(बनसारोळा येथे ऑक्सिगान कार्यक्रम)
प्रकाश मुंडे ।‌बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
तालुक्यातील बनसारोळा येथील  महाराष्ट्र विद्यालयातील कोविड रूग्णांच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध गायक कलावंत प्रकाश बोरगावकर प्रस्तुत ऑक्सिगान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. 7 मे रोजी सायंकाळी 8 वाजता करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब अंबाजोगाई, मानवलोक अंबाजोगाई, आरोग्य विभाग बीड, स्व.नारायणदादा काळदाते प्रतिष्ठाण अंबाजोगाई व महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले होते.

केज अंबाजोगाई चे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी कोड केंद्रातील कार्यक्रमात हातात माईक घेऊन गायनातून रुग्णांना ऊर्जा दिली उपविभागीय अधिकारी झाडके यांचे हे कलावंत रूप समोर आले
हे गेल्या वर्षभरापासुन कोविड रूग्णांच्या सेवेसाठी मोठ्या हिकमतीने काम करत आहेत. कारण अंबाजोगाई तालुक्यामध्ये किंवा विभागामध्ये कुठलीही समस्या उद्भवली तर त्या समस्येचे निराकरण करणे आणि तात्काळ व्यवस्था करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अंबाजोगाई उपविभागाचे पालक म्हणून त्यांच्यावर खुप मोठी जबाबदारी असतानाही त्यांनी समाजासाठी व कोविड रूग्णांसाठी ज्या संस्था व जी माणंस काम करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी ते सतत पुढं असतात. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी झाडके बनसारोळा येथे उपस्थित होते. 

उपस्थितांची गाणे मनमुराद ऐकल्यानंतर त्यांच्यातील कलावंत सुद्धा जागा झाला. आणि त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या करत स्वतः देखील गाणी गायली ज्यामध्ये सुधीर फडके यांचे विठु माऊली तू माऊली जगाची व स्व.किशोर कुमार यांचे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एक उपजिल्हाधिकारी आपल्यासाठी गाणे गात आहे. हे लक्षात आल्यानंतर कोविड रूग्णांनी झाडके यांच्या कामाचे कौतुक करत हे करत असलेल्या कामाबद्दल प्रशंसा केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाडके यांच्यामधील महाविद्यालयीन जीवनातील कलावंत दिसून आला.

उपविभागीय अधिकारी यांच्या गायनाने कोविड केंद्रातील रुग्णांना ऊर्जा मिळाली आधार मिळाला या विशेष कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
close