shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवाज्ञा मोशन पिक्चर्स आणि प्रतीक्षा मुव्हीज आयोजित ऑनलाइन धमाल तिहेरी स्पर्धेचा निकाल जाहीर..!!

मागच्या जवळपास दीड वर्षा पासून कोरोना-लॉकडाऊन,हस्पिटल-ऑक्सिजन ची कमी, अनेकांचे मृत्यू अश्या अनेक भयंकर गोष्टीमुळे अनेकांचे आर्थिक तसेच मानसिक ही खच्चीकरण झालेलं असतांना.

त्यातून थोडा दिलासा मिळावा या उद्देशाने प्रतीक्षा मुव्हीज आणि शिवाज्ञा मोशन पिक्चर्स च्या माध्यमातून राज्यभरातील महिला, पुरुष,कलाकार मंडळी साठी  लॉकडाऊन स्पेशल  ऑनलाइन तिहेरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, 




ज्या मध्ये "महाराष्ट्राची मराठी अप्सरा"

"महाराष्ट्राची शान मराठी सौभाग्यवती" आणि "महाराष्ट्राचा मराठी हास्यसम्राट"

असे तीन विभाग होते, आणि सर्वासाठी निःशुल्क प्रवेश होता.ज्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन तीनशे पेक्षा जास्त मुली,महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदविला.




पुणे मुंबई नाशिक सह  महाराष्ट्रातील अनेक जिह्याचा या मध्ये समावेश होता. काल सायंकाळी ह्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

या मध्ये "महाराष्ट्राची मराठी अप्सरा" म्हणून पुण्याची संपदा गायकवाड हिची निवड करण्यात आली तर


"महाराष्ट्राची शान मराठी सौभाग्यवती" या पुरस्कारासाठी 

प्रथम पुरस्कार 

जयश्री चौधरी (नाशिक)अंजली खैरे ( नारायणगाव)

जयश्री चौधरी (नाशिक),


अंजली खैरे ( नारायणगाव)


द्वितीय क्रमांक 

मनीषा शिंदे (नाशिक), रुपाली कामठे (पुणे)

मनीषा शिंदे (नाशिक)


रुपाली कामठे (पुणे)



तर तृतीय क्रमांकासाठी 

डॉ भारती मढवई ( नांदेड ), वृद्धी बारटक्के (सातारा ) 

यांची निवड करण्यात आली..

डॉ भारती मढवई ( नांदेड )

वृद्धी बारटक्के (सातारा ) 



हास्यसम्राट पब्लिक चॉईस अवॉर्ड साठी भटू चौधरी (धुळे ), 

भटू चौधरी (धुळे ), 


मराठी अप्सरा पब्लिक चॉईस अवॉर्डसाठी ऋतुजा वावरे (पुणे)

ऋतुजा वावरे (पुणे)

तर मराठी सौभाग्यवती पब्लिक चॉईस अवॉर्ड साठी रत्ना दहीवेलकर या सर्वाना जनतेने सर्वाधिक पसंती

 रत्ना दहीवेलकर


 दर्शविली.  तर औरंगाबाद चे लकी पैठणे हे "महाराष्ट्राचा मराठी हास्यसम्राट" ठरले.

 लकी पैठणे (औरंगाबाद)


नाशिक च्या डॉ.राखी मुथा ह्यांना महाराष्ट्राची सौभाग्यवती "कोरोना योद्धा"  

 डॉ.राखी मुथा (नाशिक)_

हा विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला. ह्या पैकी प्रथम क्रमांक घेऊन निवडून आलेल्या कलाकारांना आगामी मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार असून,

सर्व कलाकारांचा पुरस्कार वितरण हा कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 मुंबई या जागतिक  पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती कला- समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवार यांनी सांगितले.

या स्पर्धेत सहभागी होऊन खऱ्या अर्थाने आम्हाला काही दिवसा साठी का होईना कोरोनाच्या नकारात्मतेतून बाहेर निघता आल्याचं समाधान अनेक सहभागी कलाकारांनी व्यक्त केलं.

तर आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक जुन्या मित्राशी बऱ्याच दिवसांनी ऑनलाइन पद्धतीने का होईना गप्पा मारल्याच मत अनेकांनी व्यक्त केलं.

या स्पर्धेचे आयोजन प्रतीक्षा मुव्हीज आणि शिवाज्ञा मोशन पिक्चर्स च्या माध्यमातून करण्यात आलं होतं तर मीडिया पार्टनर म्हणून साप्ताहिक वृत्तपत्र "शिर्डी एक्स्प्रेस" हे होते..

या साठी सहायक दिग्दर्शक प्रकाश दळवी, रोहन देसाई, शिवम खोसे, अमर फटकरे सह विशाल जेठे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली तर

शिवाज्ञा मोशन पिक्चर्स चे सर्वेसर्वा दत्ता खोसे, प्रतीक्षा मुव्हीज चे अंजना मच्छीन्द्र कुसाळकर आणि अहमदनगर चे जेष्ठ पत्रकार आणि शिर्डी एक्स्प्रेस चे सर्वेसर्वा रमेश जेठे सर ह्यांचे विशेष सहकार्य होते.

ही संपूर्ण ऑनलाइन तिहेरी स्पर्धा आगामी बात्तकु (एक वास्तविकता) ह्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लेखक दिग्दर्शक- रमेश पवार








close