एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन आणि सुखकर्ता फाउंडेशन , एरंडोल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर येत्या रविवारी दिनांक २३ मे २०२१ रोजी एरंडोल येथील जाखेटे भवन , पांडववाडा येथे दुपारी ४ ते ६:३० ह्या वेळेत आयोजित केलेले आहे तरी याचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
प्रमोद चौधरी
एरंडोल शहरात म्युकरोमायकोसिस व पोस्ट कोव्हीड च्या इतर आजारांचे रोगनिदान व मार्गदर्शन शिबिर !
एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन आणि सुखकर्ता फाउंडेशन , एरंडोल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर येत्या रविवारी दिनांक २३ मे २०२१ रोजी एरंडोल येथील जाखेटे भवन , पांडववाडा येथे दुपारी ४ ते ६:३० ह्या वेळेत आयोजित केलेले आहे .
सद्यस्थितीत कोरोनासंसर्गातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे . म्युकरमायकोसिस ह्या बुरशीजन्य व जीवघेण्या अश्या आजाराचा हि ह्यात समावेश आहे . जळगाव जिल्ह्यातही अश्या रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असल्यामुळे ह्या आजाराबाबत जागरूकता असणेकामी व लवकर निदान होणेसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे .
ह्या रोगनिदान व मार्गदर्शन शिबिरात जळगाव येथील नेत्ररोगतज्ञ् डॉ . धर्मेंद्र पाटील ,डॉ . राहुल मयूर ( पॅथॉलॉजिस्ट ) , डॉ . नरेंद्र ठाकूर ( भूलवैद्यकतज्ञ् ) , एरंडोल येथील दंतरोगतज्ञ् डॉ . मकरंद पिंगळे , डॉ . इब्राहिम बोहरी हे म्युकरोमायकोसिस संदर्भात व एरंडोल येथील फिजिशियन डॉ . फरहाज बोहरी , डॉ . स्नेहल पाटील , डॉ . सुयश पाटील हे पोस्ट कोव्हीड लक्षणे अन आजार ह्याबाबत मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत .
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी , त्यांच्या जवळील नातेवाईकांनी , आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींनी ह्या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा त्याचबरोबर अश्या संशयित रुग्णांना ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ . सुधीर काबरा , सचिव डॉ . राहुल वाघ , सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ . नरेंद्र ठाकूर , डॉ . गीतांजली ठाकूर ह्यांनी केले आहे .
ह्या शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधनात्मक त्रिसूत्री चा वापर केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन व उपचाराची जुनी कागदपत्रे घेऊनच नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे .

