shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

९५ व्या वर्षी इंदुबाईने प्रबळ इच्छाशक्तीने हरवले कोरोणाला..!!


साकुरी : कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनेक जण भीतीच्या सावटाखाली जगत आहे वाढलेले वय मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती व सकारात्मक भूमिका यामुळे शिर्डी  लगत असलेल्या निघोज येथील  इंदुबाई खंडू मते या ९५ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोणावर यशस्वी मात केली आहे.

 निघोज येथील प्रगतशील शेतकरी   बाबासाहेब मते भाऊसाहेब मते यांच्या मातोश्री व निघोज ग्रामपंचायतीच्या  सदस्य आशा मते यांच्या सासू यांना नुकताच कोरोणाचा प्रादुर्भाव झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर लक्षात आली वाढलेले वय यामुळे शिर्डी येथील साईबाबा संस्थान च्या डॉक्टरांनी घरीच औषध उपचार करा असा सल्ला दिला डॉक्टरांचे मार्गदर्शन व घरातील कुटुंबांची सेवेची सकारात्मक भूमिका यामुळे घरीच विलगीकरणात ठेवून त्यांची देखभाल व उपचार केला पंधरा दिवसानंतर तपासणी केली असता इंदुबाई चा अहवाल निगेटिव आला.

याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य आशा मते म्हणाल्या की सध्या कोरोणा झाल्यावर संपूर्ण कुटुंब भयभीत होते असे न करता सकारात्मक भूमिका ठेवून  एच आर सी टी स्कोर ची चिंता केली जाते चिंता करण्यापेक्षा वेळीच उपचार करणे गरजेचे आहे आजार अंगावर काढला तर स्कोर वाढतो योग्य उपचाराने रुग्ण बरा होत असतो मात्र उपचारा बरोबर रुग्णाची सकारात्मक भूमिका  महत्त्वाचे असते अशावेळी घरातील सदस्य जरी वयोवृद्ध असेल तरी खचून जाऊ नये वाढलेले वय मात्र कुटुंबातील सदस्यांनी एक विचाराने केलेली सेवा९५ व्या वर्षीही या आंजीनी  आपले मनोधैर्य खचू दिले नाही.

 मन शांत व योग्य आहार ध्यानधारणा डॉक्टरवर विश्वास व सकारात्मक विचार जर ठेवला तर कोरोणावर  मात करता येते हे जणू काही ह्या  वयोवृद्ध आजी इंदुबाई खंडू मते यांनी दाखवून दिले आहे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मते व उद्योजक  संजय गव्हाणे म्हणाले की आज कोरोणाच्या काळात रक्ताचे नातेवाईक देखील दुर्लक्ष करताना बघितल्यावर खंत वाटते मात्र असे न करता ह्या वयोवृद्धांना मानसिक व योग्य औषध उपचार फार गरजेचा  आहे   

इच्छाशक्ती असेल तर कोरोणालाही हरवता येते हे   निघोज येथील मते कुटुंबीयांनी   दाखवून दिले आहे या  कुठली व्यक्ती कोरोणा बाधित झाल्यास शांतमन  , योग्य आहार ,ध्यानधारणा  सकारात्मक व धार्मिक विचार या सूत्राचा अंगिकार केला  तर वय कितीही असो तरी   कोरोणाला हरवु शकतो हेच   मते परिवाराने  दाखवून दिले आहे
close