राज्यातील क्रीडांगणे खुले करण्यासाठी युथ आयकॉन फौंडेशनचे प्रयत्न : मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी:क्रिडा प्रशिक्षक यांना कोरोना निर्बंध असे पर्यंत आथिर्क मदत जाहीर करावी.तसेच काही नियम अटी घालून मैदानावरील खेळास परवानगी देण्याचा तज्ञ समिती मार्फत विचार करावा. मागिल वर्षी हि कोरोना संकटातच गेले या हि वर्षी कोरोना संकट मुळे कडक. निर्बंध लादण्यात आली आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे. घरात बसुन बसुन शारीरिक तंदुरुस्ती वर परिणामी होत आहे.
वर्षभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रीडाक्षेत्र हळूहळू का हाेईना, पूर्वपदावर येताना पहावयास मिळत होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नियम कठाेर करण्यात आले आहेत.
जुनच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञानी वर्तवली आहे.
परंतु मागील काही दिवसांपासून काेराेनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी नियम आणखी कठाेर करण्यात आले आहेत. प्रसार रोखण्यासाठी काही कडक निर्बंध आणि नियम लागू केले असून याचा फटका राज्यातील क्रीडा क्षेत्राला बसत आहे. काही क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण वर्ग नुकतेच सुरू झाले हाेते. मात्र, काही दिवसांतच हे वर्ग बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.
परिणामी क्रीडा प्रशिक्षकांवर पुन्हा संकट आले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साेबतच जिल्हातील कराटे , धनुर्विद्या, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलिबॉल व अन्य मैदानी खेळ तर स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, कुस्ती व योगा यांच्यासह इतर खेळांवर संकट उभे राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर युथ आयकॉन फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ई-मेल पत्र द्वारे निवेदन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूं आणि प्रशिक्षकांकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आंतरराष्ट्रीय कराटे पटु आणि युथ आयकॉन फाउंडेशन चे सीईओ सबील सय्यद , प्रदेशाध्यक्ष शिवा म्हस्के , प्रदेश सचिव मयरेश बुचकूल यांनी या ई-मेल पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. क्रीडा क्षेत्रांवरती प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे "क्रीडाक्षेत्र वाचवा, अशी मोहीम युथ आयकॉन फाउंडेशन क्रीडा विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये अनेक क्रीडाप्रेमींनी सहभाग नोंदवला आहे यासंदर्भात अनेकांनी आपल्या फेसबुक व्हाट्सअप वर स्टेटस देखील ठेवलेले दिसून आले किमान राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना तरी सरावासाठी परवानगी द्यावी आणि त्यांच्यासाठी तरी मैदाने सुरू व्हावी अशी मागणी या माध्यमातून क्रीडाप्रेमींनी केली आहे...
क्रीडा प्रशिक्षकांसाठी गतवर्षी अतिशय भयावह परिस्थिती होती. त्यातून कसेबसे ते सावरत असतानाच सध्याच्या संचारबंदीमुळे प्रशिक्षकांसह त्यांचे कुटुंबही अडचणीत आले आहे. अशा काळात शासनाने प्रशिक्षकांचा विचार करणे आवश्यक आहे.
सबील सय्यद , आंतरराष्ट्रीय कराटेपटु , सीईओ युथ आयकॉन फौंडेशन..!
क्रिडा प्रशिक्षक यांना कोरोना निर्बंध असे पर्यंत आथिर्क मदत जाहीर करावी.तसेच काही नियम अटी घालून मैदानावरील खेळास परवानगी देण्याचा तज्ञ मार्फत विचार करावा. मागिल वर्षी हि कोरोना संकटातच गेले या हि वर्षी कोरोना संकट मुळे कडक. निर्बंध लादण्यात आली आहेत.त्यामुळे उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे. घरात बसुन शारीरिक तंदुरुस्त वर परिणामी होत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू करिअर परिणाम होत आहे.तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी आमची विनंती आहे.

