shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तौक्ते चक्रीवादळा मुळें सहा म्हशी दगावल्या..! चक्रीवादळ म्हशीच्या जिवावर बेतले ..!


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर शहरांमध्येही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.कानडेमळा येथील शेतकरी सदाशिव भाऊसाहेब निस्ताने यांच्या ३० म्हशी नेहमी प्रमाणे कानडेमळा जवळील भिगारनाल्या मध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या असताना या तौक्ते चक्रीवादळामुळे विद्युत पोल वरील विजेच्या तार तुटून विजेचा कंरट पाण्यात उतरल्याने त्याच ठिकाणी या म्हशींना बसलेल्या असल्याने त्या जागीच ठार झाल्या.

त्यामुळे या शेतकऱ्याचा सुमारे ९ते१० लाख रुपयेचे नुकसान झाले. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामा करण्यात आला.

 सुदैवाने याठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच आपल्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून तातडीने मिळवून देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक प्रकाश भागानगरे व शेतकरी सदाशिव निस्ताने यांनी आहे.
close