राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-
तळागाळातील सर्वांचा विकास झाला पाहिजे म्हणून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कुसुंबळे ग्रामपंचायतीने कोरोना कालावधीतही आपले समाजकार्य सुरुच ठेवले आहे.
कुसुंबळे ग्रामपंचायतमध्ये 5% टक्के अपंग कल्याण निधीतून अपंगाना फिल्टर वाटप तसेच पोयनाड पोलीस ठाण्याकडून बेघर लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप बुधवार दिनांक 5 मे 2021 रोजी वाटप करण्यात आले. या उपक्रमातून अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करण्यात शिवसेना कठिबद्ध असल्याचे दाखवून दिले.
याच वेळी पोयनाड पोलीस ठाण्याकडून कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना गावटाकणीसाठी ग्रामपंचायत कडून आर्थीक मदतही करण्यात आली. यावेळी पोयनाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहूल अतिग्रे, पोयनाड पोलिस स्टेशनचे जाधव साहेब, कुसुंबळे ग्रामपंचायत सरपंच सौ. मीना लोभी, उपसरपंच सौ. रसिका केणी, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील, प्रमोद पाटील, अर्चना पाटील व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कुसुंबळे ग्रामपंचायतीने नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून समाजातील वंचित घटकाला शासकीय योजना पोहचवण्याचे काम केले आहे. कोरोना रोखण्याचे काम करत असताना समाजातील सलोखा कायम रहावा, वादविवाद मिटावेत यासाठी प्रयत्न करणार्या पोयनाड पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचेही राजा केणी यांनी कौतुक केले. कोरोना नियमावलीचे पालन करत कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर हा फिल्टर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

