shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध
इंदापूर प्रतिनिधी:-

   पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा इंदापूर भारतीय जनता पक्षाने जाहीर निषेध नोंदवला आहे. या हिंसाचारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बळी गेला असून त्याचा निषेध म्हणून दि ५ मे २०१९ रोजी इंदापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे निषेध नोंदवला आहे.
      राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार,  पश्चिम महाराष्ट्र किसान मोर्चा सहसंयोजक माऊली चवरे, पश्चिम महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस गजानन वाकसे,शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राम आसबे,ललेंद्र शिंदे, जगदीश मोहिते, इम्रानभाई जमादार, दादा गवळी, तेजस जगताप यांनी तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
    या निवेदनात म्हटले आहे,की दि. २ मे २०२१ रोजी पश्चिम बंगाल राज्यामध्ये निवडणूकांचा निकाल जाहिर झाला.भारतीय जनता पार्टी ला सदर निवडणूकीमध्ये यशाने कचरती हुलकावणी दिली. वास्तविक पहाता पूर्वीच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीस भरपूर जागा मिळाल्या. जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाने मोठया मनाने स्विकारला. तरीही पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराचा उद्रेक झाला. भारतीय जनाता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर, पदाधिका-यांवर अन्याय झाला. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिंसाचारात बळी पडलेल्या
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनम्रपूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत आहोत.पश्चिम बंगालच्या निवडणूकीत आपणास निश्चित असे यश मिळवता आले नाही. परंतू आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निकराचा लढा दिला हे महत्वाचे.तरीही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडतो, हा लोकशाहिला काळीमा फासनारा असून ती एक प्रकारे
लोकशाहिची हत्याच आहे. महाराष्ट्रातील सरकार मायबाप, विचारवंत, बध्दिवंत, लेखक, पत्रकारांनो पश्चिम बंगालच्या काळीमा फासणा-या हिंसाचाराबद्दल काहितरी बोला, काहितरी लिहा. पश्चिम बंगाल मधील भातीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी या कठीन प्रसंगी आम्ही उभे आहोत. हा संघर्ष तुमचा एकटयाचा नसून लोकशाहिवर विश्वास ठेवणा-या सर्वजनांचा हा संघर्ष आहे.
हिंसाचाराच्या या राक्षसी वृत्तीचा आपण इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा जाहिर निषेध.
close