shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडगाव तांदळी व देऊळगाव सिध्दी या ठिकाणी लसिकरण..!



नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील गाव तिथे लसिकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन लसिकरण सुरळीत पार पडते का नाही त्यांची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी कर्मचारी  तसेच ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन दररोज यात जे नियोजन छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत.त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक गावात लसिकरण होणारं आहे.तसेच आज या गावातील नागरिकांना लस आपल्या गावात उपलब्ध झाल्याचे वेगळेच समाधान नागरीकांच्या चेहर्यावर दिसत होते. 

नागरीक शिस्त सोशल डिस्टान चे पालन करुन लाईन मध्ये लसिकरण करून घेतांना दिसले.या आधी ज्या नागरीकांनी  आरोग्य उपकेंद्र केंद्रावर जाऊन लस घेतली होती त्यांनी देखील आज या लसिकरण मोहिम बदल आपले मनोगत व्यक्त केले.आरोग्य केद्रवार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.ती होऊ नये म्हणून आम्ही आमच्या व्यथा लोकप्रतिनिधी कळवल्या होत्या त्यांची दखल घेतली.अशाच पध्दतीने संपूर्ण गावांचे लसिकरण पुर्ण  होईल पर्यंत घेत रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

गाव तिथे लसिकरणाचे चांगले परिणाम दिसून येत आहे.या वेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संजय गिरवले, बाळासाहेब मेटे, सरपंच अनिल ठोंबरे, संरपच बुलाखे, गणेश पिंपळे, वैद्यकीय अधिकारी अनिल ससाणे,सविता ससाणे, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
close