करमाळा । प्रतिनिधी (संतोष वायकर):
कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. परिणामी कोरोना बाधित रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी केशव प्रतिष्ठानच्या वतीने भा.ज.पा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, आरोग्य अधिकारी डाॕ.अमोल डुकरे तालुका आरोग्य अधिकारी डाॕ. सागर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालालजी देवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, डॉक्टर असोशियन चे अध्यक्ष डॉ श्रीराम परदेशी डॉ.राहुल कोळेकर, डॉ अविनाश घोलप, डॉअमोल घाडगे क.न.पा नगरसेवक महादेव अण्णा फंड, मनसे तालुकाप्रमुख संजय (बापू)घोलप,नगरसेवक सचिन घोलप, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिपक चव्हाण,
सरपंच विनय ननवरे, केमिस्ट असोसिएशनचे सचिन साखरे, भाजपाचे सरचिटणीस नितीन आढाव पत्रकार सुहास घोलप आशपाक सय्यद,विशाल (नाना)घोलप,यांच्यासह अनेक प्रतिष्ठित, मान्यवर व केशव प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

