नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे 'गाव तेथे लसीकरण ' मोहिमेअंतर्गत रॅपिड अँटीजेन टेस्ट करून लसीकरण करण्यात आले.
या शिबिरात ज्या व्यक्तींना पाहिला डोस घेऊन 45 दिवस झाले अशा व्यक्तींना प्रधान्याने डोस देण्यात आले.
यानुसार 96 जणांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली यामध्ये 11जण बाधित निघाले. यामध्ये साकत 6, तांदळी 2, मठपिंपरी 2, मुंबई 1असा समावेश आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ व माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ग्रामसेवक मनीषा सुडके, तलाठी महादेव शेलार, सरपंच जाईबाई केदारे, उपसरपंच बाबासाहेब चितळकर, दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के, से. सो. अध्यक्ष अशोक शिंदे, ग्रा. सदस्य तात्या वाघमोडे, किशोर पवार, सुभाष पवार, गोवर्धन पवार, बापू केदारे, अविनाश पवार, अविनाश निमसे आदी उपस्थित होते.
लसीकरणासाठी रुईछत्तीसी उपकेंद्रच्या आरोग्य अधिकारी सविता ससाणे, डॉ. सूर्यकांत यादव, डॉ. मनीष हिवाळे, मनीषा बनसोड, रंजना कसबे पी. बी. जाधव, के. आर. उगले, एस. जे. भालसिंग, एन. के. नाईक, अशा सेविका स्वाती पाठक, कर्मचारी सिदू केदारे आदींनी परिश्रम घेतले.

