प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा (दि.१२) : येथील पो.नि.सूर्यकांत कोकणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौज कंदर या गावात काही लोक अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार ,पो. हेड.कॉ.देवकर, पो.कॉ . व्यवहारे, जगदाळे,ढवळे ,महिला पोलिस कॉ.घोडे यांचे पथक कंदर गावात रवाना केले.
या पथकाने कंदर गावात सहा ठिकाणी धाडी टाकून विनापरवानगी अवैध दारु विक्री करणाऱ्या सहा इसमांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे साहेब,पो.नि.सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील पथकाने केली .
या गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि .सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोरख ढाकणे हे करत आहेत.

