shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस निरीक्षक श्री. सूर्यकांत कोकणे करमाळा पोलीस ठाणे यांची अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई...!



प्रतिनिधी : सूर्यकांत होनप

करमाळा : करमाळा पोलिस ठाणे हद्दीत दि.७/५/२०२१ रोजी करमाळा शहरातील अवैद्य दारू मोटर सायकल वरून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिळाल्यानंतर डी.बी.  पथकाचे पोहेकॉ /३१३ देवकर, पोकॉ/८६७ ढवळे, पोकॉ/ १२७० गवळी, पोकॉ/ १५५० काझी, यांनी मौलाली माळ, करमाळा येथे अवैद्य विदेशी दारू मोटर सायकल वरून वाहतूक करणाऱ्या इसम नामे  गुणवंत महादेव खाडे राहणार सोनारी ता. परंडा जि. उस्मानाबाद यांना ताब्यात घेऊन त्याचे कडून मोटरसायकल व विदेशी दारु माल  असा एकूण ४६,४००/- रू .चा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरुद्ध करमाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

 
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री .अतुल झेंडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री .डॉ. विशाल हिरे ,मा. पोलीस निरीक्षक सो श्री . सूर्यकांत कोकणे सो यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाचे अंमलदार यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ /३१३ संतोष देवकर हे करीत आहेत.
close