अहमद रजा सोशल फौंडेशनच्या वतीने दोनशे गरजू मुस्लिम कुटुंबांना रमजान च्या निमित्ताने शिरखुर्मा किटचे वाटप
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील अहमद रजा सोशल फौंडेशन भरतशेठ शहा व अँड.राहुल मखरे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने तब्बल दोनशे गरजू मुस्लिम कुटुंबांना रमजान ईदच्या सणाच्या निमित्ताने शिरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
एकंदरीत पहाता कोरोनाने संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातले असून सद्यपरिस्थिती आठोक्यात आणण्याकरिता शासनाने विविध ठिकाणी लॉकडाउन घोषित केल्याने अनेक उद्योग व्यवसाय ठप्प आहेत.त्यामुळे अनेकांच्या हाताला काम धंदा नसून उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबांना ईदचा हा आनंदोत्सव इच्छा असूनही साजरा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा कुटुंबांमध्येही ईद आनंदाने साजरी होण्यासाठी सामाजिक जाणिवेतून अहमद रजा सोशल फौंडेशन भरतशेठ शहा व अँड.राहुल मखरे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने दिलेला मदतीचा हात वाखाण्याजोगा आहे.
रमजान ईदमधील वैशिष्ट्यपूर्ण शीरखुर्मा या खाद्यपदार्थासाठी लागणारे काजू, बदाम, पिस्ते, शेवया, खोबरे, साखर, खजूर,चारोळे तसेच विविध प्रकारच्या डाळी व साहित्याचे दोनशे कीट यंदा गरजूंनपर्यंत पोहोचवण्यात आले. त्यामुळे या सर्व कुटुंबांची रमजान ईद अधिक उत्साहात साजरी होणार अशी माहिती एचकेजीएन ग्रुपचे अध्यक्ष रियाजभाई बागवान व वसीमभाई शेख यांनी दिली.
गतवर्षी देखील कोविड-१९ च्या उद्रेकामुळे मेटाकुटीला आलेल्या गरजू व सर्वसामान्य वर्गातील मुस्लिम समाजातील कुटुंबांना रमजान ईद आनंदाने साजरी करता यावी यासाठी सदरील सामाजिक संस्थेकडून शिरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप करून आनंद द्विगुणित केला गेला होता.

