shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मठपिंप्रि गावात कोरोना रॅपिड ॲटिजन स्टेट कँप..!


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील मठपिंप्रि गावात ज्या नागरिकांना शंका  आहे.किंवा कोरोना‌ बांधीत रुग्ण संपर्क आला आहे अशी शंका  असल्यामुळे कोरोना तपासणी कँप आयोजित करण्यात आला होता.‌

कोवीड तपासणी वेळीच झाल्यावर कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी मदत होते. या पुर्वी अनुभव आहे.या वेळी मठपिंप्रि गावात एकुण तपासणी ९१,बांधीत रुग्ण ०७, निगेटिव्ह ८४ , बांधीत रुग्ण गावा प्रमाणे मठपिंप्रि ०५, हातवळण ०२, असे एकुण बांधीत रुग्ण ०७, आढळुन आले. या रुग्णांना पुढील उपचारासाठी ‌शासकिय कोंविड सेंटर ला तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले. 

संबंधित रुग्ण एकदम तंदुरुस्त होते.यात ०७ रूग्णा विशेष कोणता हि त्रास होतांना दिसला नाही. या रूग्णांना   योग्य ते उपचार मिळावेत यासाठी पंचायत समिती उपसभापती रविंद्र भापकर यांनी दुरध्वनी वरून संबंधित डाॅक्टराना विनंती पुर्वक काळजी घ्यावी असे कळवले. 

रुईछत्तीसी उपकेंद्र च्या वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे, डॉ.हिवाळे,भालसिंग, बांगर, आशा सुपर वायझर विजया लंके,कालेॅ मॅडम,हा कँप यशस्वी होण्यासाठी मठपिंप्रि  गावचे संरपच हौसराजे नवसुपे, शिंदे विजय,अतुल चौधरी, आदित्य राऊत,शरद नवसुपे, आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आदी कर्मचारी अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
close