मोठ्या शिताफीने पकडला फरार आरोपी ...!
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा (दि.११) : येथील पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करमाळा पोलीस ठाणे कडील आर्म एक्ट मधील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी हिसरे गावात आला असल्याची माहिती मिळाली .
त्यानंतर पो.नि.कोकणे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने,पो.हे.कॉ. देवकर, पोलीस नाईक हराळे ,पोलीस कॉन्स्टेबल काजी,ढवळे ,महिला पो. कॉ. आनारसे यांचे पथक हिसरे गावात रवाना केले.
या पथकाने हिसरे गावात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील आर्म ॲक्ट मधील फरारी आरोपी नाना उत्तम काळे (वय 42 वर्षे ) रा . हिसरे ता .करमाळा याला अटक केली.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . विशाल हिरे साहेब, पो.नि. सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि. तळपे हे करत आहेत.

