shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर- भूतबाधेचे निमित्त दाखवून मांत्रिकाचा महिलेवर अत्याचार... गुन्हा दाखल..?


संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप):-
संगमनेर मधील पारेगाव बुद्रुक येथील मांत्रिकाने महिलेला भूतबाधा झाली ती उतरावी लागेल. असे सांगून महिलेवर अत्याचार केला. तिच्या पती व मुलाला सोबत बोलावले, त्यांना येतानी दारू आणायला सांगितले, व महिलेला भूतबाधा झाली आहे.

 असे सांगून तिला बळजबरीने दारू पाजली व तिला शेतात घेऊन जाऊन तिच्या विरोधात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने ही संपूर्ण घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली व त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत, सावित्रा बाबुराव गडाख, याच्यावर बलात्कार जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

सविस्तर वृत्त असे की,सिन्नर येथील 45 वर्षीय पीडित महिला 5 वर्षापासून सारखी आजारी पडत व अशक्तपणा येत असे म्हणून भावाने पारेगाव बुद्रुक येथील मांत्रिका कडे नेले व त्याने तिला अंगारा दिला व त्या अंगाराने तिला पुर्वी फरक जाणवला. त्यानंतर ते तिच्या नवऱ्यासोबत कायम मांत्रिकाकडे येत असे. 23 एप्रिल ला तिचे दुखणे वाढले, तेव्हा मांत्रिकाला फोन केला. तेव्हा त्याने त्यांना दारूची बाटली घेऊन यायला सांगितले व त्यानंतर तिला दारूपाजून त्यांनी तिच्यावर अत्याचार केला.
close