shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेंढरे ग्रामपंचायत येथे लसीकरण केंद्रासाठी परवानगी सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या पाठपुराव्याला यश...!


राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :

चेंढरे ग्रामपंचायत येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र उपलब्ध त्यासोबत ग्रामपंचायत करणार  ६०वर्षांवरील जेष्ठनागरिक अपंगांना मोफत ने आण करण्याची व्यवस्था

          सरप़ंच

नागरिकांच्या सोयीसाठी प्राधान्य क्रम देऊन चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ स्वाती पाटील मॅडम, उपसरपंच श्री यतीन घरत आणि सर्व सदस्य यांनी या कोविड कालावधीत नागरिकांना कोरोना लस घेणे सोयीचे व्हावे तसेच जास्त लोकसंख्या या ग्रामपंचायत हद्दीत आहे याकरिता चेंढरे येथे लसीकरण केंद्र मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. त्याकरिता अलिबाग तहसिल कार्यालय, प्रांत ऑफिस, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व रायगड जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करून सातत्याने  पाठपुरावा करत होते. त्यांच्या मेहनतीला आज यश आले. 
           उपसरपंच

  मा. जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांनी चेंढरे ग्रामपंचायत येथे लसीकरण केंद्रासाठी परवानगी दिली आहे. या लसीकरण केंद्रासाठी ग्रामपंचायतीने आपला हॉल उपलब्ध करून दिला आहे.
  
आपल्याला सुरवातीला 45 वर्षा वरील नागरिकांसाठी सेंटर मिळालं आहे , चेंढरे ग्राम पंचायतीने  लसीकरण केंद्रावर वर गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच नोंदणीसाठी स्वतःचा  स्वतंत्र  डिजिटल ऑनलाइन फॉर्म केला आहे. त्या द्वारे नागरिकांना घरबसल्या  पूर्व नोंदणी करता येणार आहे, तसेच अपंग नागरिकांसाठी वाहन व्यवस्थाही चेंढरे ग्रामपंचायत करणार आहे.
तसेच आपल्याला कडे मोबाईल नसल्यास    
दुसऱ्याच्या फोनवरूनही रजिस्टर करायची सोय उपलब्ध आहे.

चेंढरे ग्रामपंचायत येथील लसीकरण केंद्रामुळे इतर लसीकरण केंद्रावरील ताण कमी व्हायला मदत होणार आहे. व आपल्या नागरिकांना जवळच्या जवळ हे केंद्र उपलब्ध झाल्यामुळे त्यांची होणारी फरफट थांबणार आहे. 

हे लसीकरण केंद्र चेंढरे येथे व्हावे, यासाठी  माजी रा.जि.प. उपाध्यक्ष आद. आस्वादजी पाटील(पप्पूशेट) माजी जि. प. सदस्य श्री संजय पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. 

जिल्हा परिषद सदस्या सौ प्रियदर्शनी पाटील मॅडम व पंचायत समिती उपसभापती सौ मीनल माळी यांचे सहकार्य लाभले आहे.

 ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील मॅडम, उपसरपंच श्री यतीन घरत, ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद.
 
शब्दांकन लायन श्री संदीप वारगे-अध्यक्ष ममतानगर सोसायटी चेंढरे-अलिबाग
राजेश बाष्टे, पत्रकार  शिर्डी एक्सप्रेस.
close