shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"पिंपळ वृक्ष महत्व"




पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. ज्या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृुक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' म्हटले जाते. हा वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आहे.

पिंपळाचे पान


पिंपळाची उंची १० ते १५ मीटरपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची, आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात. अग्रस्थ अंकुर, उपपर्णानी झाकलेला, उपपर्णे लांबट तांबूस-गुलाबी असतात. हिरव्या रंगाची फुले, अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात याचे पुष्पाशय (फळासारखा दिसणारा भाग) पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्याची मादीपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात.


पिंपळाची फळे


पिंपळ वृक्षाचे औषधी महत्त्व:

हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यांमधे वाढून घराला हानी निर्माण करतो.
पिंपळवृक्षाचे औषधी महत्त्व
पिंपळ बुद्धीवर्धक, शक्तिवर्धक, रक्तशुद्धीकारक आणि रोगनाशक आहे. पोटाच्या विकारापासून दम्यासारख्या असाध्य विकारांमध्ये हा वृक्ष गुणकारी आहे. कावीळ झाल्यास पिंपळाच्या सालीचा काढा करून प्यायल्याने गुण येतो. कावीळ झाल्यास पिंपळाच्या सालीचा काढा करून प्यायल्याने गुण येतो.

close