shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज-धारूर रोडवर वाटमारी प्रकरणातील तीन संशयित आरोपी केज पोलिसांच्या जाळ्यात..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
रस्त्याने प्रवास करीत असलेल्या मोटार सायकलस्वारास अडवून अंगावर थुंकल्याच्या कारणावरून स्कुटी आडवी लावून वाटमारी करून एक मोबाईल व खिशातील पैसे काढून घेत मारहाण केल्याच्या घटनेतील तीन संशयित आरोपी केज पोलीसांच्या गुन्हे तपास शाखेच्या (डी.बी.) पथकाने ताब्यात घेतले आहेत.


या बाबतची माहिती अशी की, गौतम ज्ञानोबा भालेराव हे दि. १० मे सोमवार रोजी रात्री १:१०० वा. च्या दरम्यान धारूर तालुक्यातील चोरंब्याकडे मोटार सायकलवरून जात होते त्यावेळी कासारी पाटीच्या पुढे तांबवा हद्दीत एका काळ्या स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या तिघांनी त्यांना स्कुटी आडवी लावून, "तू आमच्या अंगावर का थुंकलास ?" या कारणावरून चापट बुक्यांनी मुकामार दिला होता. तसेच त्यांच्या खिशातील रोख ५ हजार ७०० रु. आणि रिअल-मी कंपनीचा मोबाईल असे एकूण १२ हजार ७०० रु. चा मुद्देमाल वाटमारी करून लुटून नेला होता. 

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि केज पोलिसांच्या गुन्हे तपास शाखेचे दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, अशोक नामदास, गृह रक्षक दलाचे जवान बाळासाहेब थोरात यानी अथक परिश्रम घेऊन सर्व माहिती व परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी यांची माहिती तसेच गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या महिती या आधारे धारूर येथील अनिल उर्फ मंगेश बालाजी सोनटक्के (वेटर, अशोकनगर, धारूर), शिवराम वैजनाथ बोबडे (मजुरी, संभाजी नगर धारूर), रेवन सोपान नखाते (खाजगी व्यवसाय, कसबा विभाग मड गल्ली धारूर) या तिघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.
close