पुणे:-कोरोनो संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोव्हिड-19 ची लागण होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.हा संभाव्य शहरात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्यात येत आहेत. या पर्श्वभूमीवर शहरातील पहिले चाईल्ड कोविड केअर सेंटर येरवडा येथे सुरु करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण तिसऱ्या लाटेत अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार आणि महापालिका सज्ज झाली आहे.
महापालिका आणि सेंट्रल फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीटीच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरु करण्यात आले असुन 40 बेडचे हे चाईल्ड कोविड केअर सेंटर असणार आहे. यामध्ये लहान मुलांच्या पालकाचीही राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असुन लहान मुलांना भिती वाटु नये याकरता विशेष सजावट भिंतीवर करण्यात आली असुन खेळण्याकरता विविध खेळणी इथ ठेवण्यात आल्या आहेत.
लहान मुलांना आवडणारे मोटू-पतलु, छोटा भीमचे कार्टुन्सही भिंतीवर लावण्यात आल्याने इथे आल्यानतंर लहान मुलांकरता आनंददायी वातावरणही निर्माण करण्यात आले आहे त्याचसोबत तीनवेळचे जेवण, नाष्टा, दूध, तज्ज्ञ डॉक्टर,नर्सेस, अँब्युलन्स ही याठिकाणी चोवीस तास हजर असणार आहेत. याच सोबत 180 बेड हे ज्येष्ठ नागरिकांकरता ही तयार करण्यात आले असुन ऑक्सिजनची सुविधाही देण्यात आली आहे.

