shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टाकळी काझी येथे ६० वर्षा वरील नागरीकांचे लसिकरण आणि कोरोना तपासणी कँम्प..!

नगर तालुक्यातील कोरोना संसर्ग मंदावतना दिसत आहे.

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील 'गाव तिथे लसिकरण" मोहिम अंतर्गत अनेक गावांत लसिकरण उपलब्ध पुरवठ्या नुकसार लसिकरण ,कोरोना तपासणी कँम्प दररोज आयोजन करण्यात येत आहे. मठपिंप्रि येथे ११५ पैकी आज‌ फक्त १ रूग्ण बांधीत आढळून आले. शिराढोण येथील तपासणी ४ रूग्ण बांधीत आढळून आले.कोरोना संसर्ग मंदावत चालेले दिसतं आहे.


आज त्यांचा एक भाग टाकळी काझी येथे पंचायत समितीचे मा.सभापती प्रविण कोकाटे यांच्या नियोजनातून वय   60 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन स्टेट तसेच RT-PCR टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका शेंदुरकर, डॉ.सांगळे मॅडम, परिचारिका देठे ,जाधव हे उपस्थित होते.

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी शिवसेना नेते शंकरराव ढगे,सरपंच शहाजी आटोळे सर,उपसरपंच अविनाश पवार,प्रा.कराळे,मा.सरपंच आसाराम मोटे,काशिनाथ गावडे,ग्रामपंचायत सदस्य अशोक ढगे,संदीप म्हस्के, संतोष ढगे,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
close