रुईछत्तीसी आणि वाळकी आरोग्य केंद्र ॲक्शन मोड मध्ये..!
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
अंबिलवाडी ता.नगर येथे कोरोना चाचणी शिबीर आणि लसीकरण करण्यात आले, रुईछत्तिशी परीसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. म्हणून गुंडेगाव गणातील प्रत्येक गावात नाकातील व घशातील तपासणी वेग वाढवुन गावोगावी कोरोना शिबीर घेऊन रुग्ण शोधण्यात आले आणि आता कोरोनाचे प्रमाणही कमी झालेले आढळून येत आहे.
आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी न सुट्टी घेता गावोगावी जाऊन लसीकरण आणि कोरोनाच्या चाचण्या करत आहे. दोन तिन दिवसांत पुर्वी दहिगाव येथे ४ बांधीत रुग्ण पैकी दशमीगव्हाण येथील २ रूग्ण बांधीत आढळले होते. तर शिराढोण येथे ४ बांधीत रुग्ण आढळले होते. हाच आकडा काही दिवसांपूर्वी ३०-४०बांधीत आकडेवारी येत होती.
त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना नियंत्रणात येत आहे,येथील कोरोना चाचणी शिबिरात एकूण ११५ जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे आणि १२० जणांचे लसीकरण करण्यात आले, यावरून असे जाणवते की ग्रामीण भागातील आरोग्य विभाग आणि ग्रामप्रशासन यांच्या सतर्कतेमुळे ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण कमी झालेले आहेत,परंतु तरीही लोकांनी अजूनही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,रुईछत्तिशी परिसरातील वाटेफळ,मठपिंप्री,गुणवडी,वडगाव,हातवळण, अंबिलवाडी,तांदळी,दहिगाव,साकत खुर्द या सर्व गावात मिळुन आज रुग्णांची संख्या ५५ च्या घरात आहे.
परंतू गेल्या पंधरा दिवसापूर्वी या गावात रुग्णसंख्या ३०० च्या घरात होती आज ती पूर्णपणे कमी झालेली आहे. यावरून रुईछत्तिशी परिसरातील आठ ते दहा गावातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असलेला जाणवत आहे.
आरोग्य विभाग आणि ग्रामसुरक्षा समिती यांच्या प्रभावी नियोजनातून हे सर्व शक्य होत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळासाहेब हराळ व आरोग्य विभागांतर्गत गावोगावी कोरोना चाचणी शिबीर आयोजित केल्याने सापडलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करुन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली असे आरोग्य अधिकारी सौ.सविता ससाणे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ,माजी उपसभापती रविंद्र भापकर,सरपंच केशव वाबळे,उपसरपंच नाथा शेटे, मारुती खताळ,बलभिम गव्हाणे,बाळासाहेब दरंदले आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

