जळगाव जिल्हा प्रतिनिधी
प्रमोद चौधरी
9960595807
एरंडोल - केद्र सरकारने केलेली रासायनिक खतांची दरवाढ मागे घेणेबाबत आज एरंडोल तहसीलदारांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की , केंद्र शासनाले खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वीच राशायनिक खतांच्या किमती मध्ये प्रती बॅग600 ते 700 रुपयांती अमानुषपणे भरमसाठ वाढ केलेली आहे .
या दरवाढीमुळे शेतकरी यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे . कोरोना या महामारी मुळे शेतकन्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे . केंद्र शासनाने पेट्रोल डिझेलच्या देखील किमती वाढविल्या असून वाढविलेल्या दर देखील तात्काल कमी करावेत , केंद्र शासनाने यांची केलेली दरबाद तत्काळ मागे न घेतल्यास एरंडोल- तालुका व शहर काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल . याची नोंद घ्यावी . असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष विजय पंदरिनाध महाजन ,सुदर्शन नामदेव महाजन , संजय मधाचे, संजय कलाल, इम्रान सय्यद, हिम्मत पाटील आदी पदाधिकारी ची हस्ताक्षर आहे.

