shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरजुवंत मुलांच्या संगोपनासाठी कृती दलाची स्थापना गरजवंत मुलांची माहीती कळवा- प्रा.ईश्वर मुंडे..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी  :-  कोरोना महामारीत अनेक जण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.अशा वेळी त्यांच्या मुलांची देखभाल व सांभाळ करण्यासाठी नातेवाईक किंवा शेजारी टाळाटाळ करतात,असमर्थता दर्शवतात.दुर्दैवाने कांही मुलांचे दोन्ही पालक मृत्यू पावले तर मुले उघड्यावर पडतात.

     
अशा बालकांचे संपूर्ण संरक्षण,संगोपन,कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा मिळावी या साठी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर महिला व बाल विकास विभागांतर्गत कृती दलाची स्थापना केलेली आहे.
      
आपल्या परिसरांत अशी गरजवंत बालके असतील तर चाईल्ड लाईन टोल फ्री क्र.१०९८,बील कल्याण समिती,बीड ७५८८१७९८४८,जिल्हा बाल संरक्षण ९४२३४७०४३७,बालगृह ९९२३७७२६९४,शिशुगृह ९४२२६५७१६४,महिला व बाल विकास मदत कक्ष ८३०८९९२२२२  या क्रमांकावर संपर्क साधून बालकांच्या संगोपनासाठी शासन उपक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन बाल कल्याण क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा.ईश्वर मुंडे (९०९६६८८३६५) यांनी केले आहे.
close