*प्राथमिक शिक्षक कोरोना पिडीत रुग्णांसाठी करत आहेत मदत..!
*लोकप्रतिनिधी हो आता तरी जागे व्हा..!
प्रतिनिधी । संजय वायकर :-
नगर (दि.३ ) :जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समाजाप्रती आपले कर्तव्य समजून मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत.
काही बोटावर मोजण्या इतकेच राजकारणी कोरोना बाधितांसाठी मदत करत आहेत.
नगर जिल्ह्यातील व तालुक्यातील नगरसेवक मिळून कोरोना सेंटर का चालू करत नाहीत ? कोरोना बाधित रुग्णां साठी आवश्यक साहित्य ,विविध उपाय योजना का करत नाहीत? त्यांना फक्त राजकारणापूरतेच मतदार आठवतात का ? या महामारी च्या काळात सर्व राजकारण बाजूला ठेवून निस्वार्थ वृत्तीने का एकत्र येत नाहीत ?
प्रभागनिहाय 'कोरोना मदत केंद्र' का चालू करत नाहीत ?
शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी कोविड सेंटरसाठी स्वयंस्फूर्तीने जमा केला. नेवासा तालुक्यातील शिक्षकांनी भेंडा येथे कोविड सेंटरसाठी ३० बेड तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले.
संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सिंधू लॉन्स येथे एक तसेच चंदनापुरी येथे दोन कोविड सेंटर उभारून तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे.
कोपरगाव ,राहाता ,राहुरी तालुक्यातील शिक्षकांनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारून आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र यासाठी ऑक्सिजन मशीन घेण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचा निधी उभा केला आहे.
नगर तालुक्यातील शिक्षकांनीही लाखो रुपयांचा निधी उभा करून त्यातून आवश्यक साहित्य खरेदी केले.कित्येक दानशुर व्यक्तींनी कोरोना बाधितांसाठी मदत केलेली दिसून येत आहे.
याप्रमाणेच जिल्हा व तालुक्यातील सर्व नगरसेवक यांनी एकत्र यावे ही या महामारीच्या काळातील गरज आहे. कोरोना बाधीत रुग्ण मदतीसाठी याचना करत आहेत .
प्रतिनिधींनो आता तरी जागे व्हा ..!!

