shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा भाजपा च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न


महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

प्रतिनिधी : संजय वायकर :-

करमाळा : कोरोना सारख्या महामारी च्या काळात संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे .त्यामुळे रक्तदान शिबिरे घेवून रक्त संकलन करणे खुप गरजेचे आहे .

भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 मे रोजी  करमाळा शहरात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.


या शिबिराचे उद्घाटन करमाळा नगरीचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी तालुका सरचिटणीस महादेव(अण्णा) फंड,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,रेल्वे सल्लागार समिती सदस्य दीपक चव्हाण,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे,संघटन सरचिटणीस शशिकांत पवार,व्यापारी आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया,युवा मोर्चा सरचिटणीस मयूर देवी,मिलिंद माने,रवी पठाडे, संजय जमदाडे,गणेश वाशिंबेकर, सचिन पांढरे, चंद्रकांत राखुंडे, मुन्ना हसीजा, उदय भालेराव उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरामध्ये महिला व युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिराचे नियोजन श्री भगवंत ब्लड बँक बार्शी यांनी केले असून 'भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा' करमाळा यांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी अशा रक्तदान शिबिरांची खुप गरज असल्याचे सांगितले आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहनही केले .
close