shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भूम सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली निवारा बालगृहास सदिच्छा भेट..!!



अनाथ मुला-मुलींची व्यथा एकूण अश्रू अनावर झाले.

खर्डा प्रतिनिधी( अनिल धोत्रे)
जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह   या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त घटकात 65 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी हा प्रकल्प चालवला जात असून या बालगृहाला भूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी भेट दिले.
  

या बालगृहाला  शासनाची कोणतीही मदत मिळत नसून हे संपूर्णपणे लोकवर्गणी चालवले जात आहे .   या बालगृहाबद्दल संपूर्ण माहिती संस्थेचे निधी प्रतिनिधी संजय शिंदे यांनी भूम पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे साहेब यांना दिली आणि त्यांनी 1 मे 2021 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या अनाथ आश्रमाला सदिच्छा भेट दिले. यावेळी या बालगृहाचा परिसर तसेच कोरोनाच्या महाभयंकर महामारी च्या काळात देखील या बालगृहात 30 मुला-मुलींचे संगोपन लोकवर्गणीतून केले जात आहे, असे बालगृह कोठेही चालू नाही या बालगृहाचे काम व बालगृहातील मुलं-मुली पाहून त्यांचे हृदय भरून आले,
 
      
यावेळी बालगृहातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन त्यांचे स्वागत केले, तसेच वेगवेगळे गीते गाऊन दाखवली तसेच संस्थेची संपूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी दिली व सूत्रसंचालन  संतोष चव्हाण सर यांनी केले,

          
यावेळी साहेबांना  या अनाथ मुला-मुलींची व्यथा एकूण अश्रू अनावर झाले, त्यांनी सर्व मुला मुलींचा परिचय करून घेतला यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही  भविष्यकाळात काय होणार आहे असे विचारण्यात आले, तेव्हा मुलांनी सांगितले आम्ही पोलीस, आर्मी, डॉक्टर, समाजसेवक असे होणार आहोत, हे मुलांचे शब्द ऐकून साहेबांचे मन भारावून गेले व त्यांनी या मुलांना सांगितले आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे, धाडसाने आपण पुढे आलो पाहिजे आपल्याला कोणी नाही, असे आपण कधीच समजायचे नाही ते म्हणाले की मी पण असेच दिवस काढले आहेत, असे दिवस कोणावर  ही येऊ नये,  मला सामाजिक क्षेत्रात मदत करायला खूप इच्छा आहे, यावेळी त्यांनी या बालगृहाला सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले,
       
यावेळी त्यांचे सहकारी शिवराज घाडगे साहेब, पंकज पंडित, सोमनाथ दातखीळे ,औदुंबर जाधव, गणेश शाळू, ऋषिकेश कुटे, सुनील मुंडे, निवारा बालगृह अधीक्षक वैजीनाथ केसकर, तुकाराम शिंदे सर, संगीता केसकर, सविता शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते
close