shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर मतदार संघासाठी 6 ॲम्बुलन्स मंजूर : आमदार लहू कानडे..!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ॲम्बुलन्स नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत होती. माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एका गरोदर महिलेला ॲम्बुलन्स न मिळाल्याने हेळसांड झाल्याचे प्रकरण आमदार कानडे यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन व प्रत्यक्ष खानापूर येथील आदिवासी वस्तीला भेटून शासन दरबारी मांडले होते. 

याच निमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ साहेबांकडे मतदार संघातील ॲम्बुलन्स नसणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ॲम्बुलन्स देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्र्यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 45 वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली. 

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव, बेलापूर, निमगाव खैरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया आणि मांजरी अशाप्रकारे मतदारसंघातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऍम्ब्युलन्स मंजूर झाल्या आहेत. 

थोड्याच दिवसात ही वाहने प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राप्त होतील. वाहन चालकांसाठी ई-निविदा काढून त्यांना मंजुरीही देण्यात आली आहे. वाहना सोबतच वाहनचालकांना ही नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनतेची मोठी सोय होणार आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या काळात ॲम्बुलन्स ची जनतेकडून मागणी होत असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने उपलब्ध होत असल्याने आमदार लहू कानडे यांनी ग्रामविकास मंत्री यांचे आभार मानले आहेत.

तसेच आमदार लहू कानडे यांनी आपले आमदार निधीमधून मतदार संघातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पाच बेड देण्याचे नियोजन केले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा यामागे उद्देश आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना मोफत उपचार मिळतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगळे यांच्याशी चर्चा करून याबाबतची योजना तयार करण्यात येत आहे.
close