shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कविता "कामगार ".. आणि " महा रूप "


" गुणवंत  कामगार "
दिला मज पुरस्कार
किती तरी तुरे  हार
जागोजागी सत्कार

केला नेता कामगार
बसा आता गप्पगार
कान मंत्र मिळे मज
टाळालावा तोंडावर

विकत घेऊ  पाहती
जीभमाझी धारधार
घालूनिया मला हार
करूपाहे माझी हार

करूनि  हे  उपकार 
दाबू पाहे  टण् कार
होयबाल्या हवा त्यां
होय ला देई  होकार

साखळदंड वाटे हार
परत दिला पुरस्कार
आवाजा पुन्हा  धार
होई  साधा कामगार

- हेमंत मुसरीफ पुणे .
  9730306996
  www.kavyakusum.com
__________________________________________

२)
महा रूप ..

महाराष्ट्राची आकृती
पाण्या सम  रंग रूप
सामावून घेई परक्या 
करी  सर्वां  एकरूप 

अभ्यासावे असे धडे
सुलेख प्रगती प्रारूप
तिजोरी  भरे  देशाची
दिले  भले  खूप खूप 

भारावेअख्ख्या जगा
संस्कृती ही सुस्वरूप 
अमोल ठेव  इतिहास 
रहावे  येथे   सुखरूप 

महाराष्ट्राच्या या  दारी
कुणी न जाय विन्मुख
परत जातां  आठवणी 
मनी सदैव  रूख रूख

बिघडू नका घडी मात्र
वागू नका कधी विद्रूप 
रामदासी  लाठी  हाती
दाऊ शंकरी  रूद्र रूप

-- हेमंत मुसरीफ पुणे .
   9730306996.
  www.kavyakusum.com

close