shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळाली प्रवरा च्या शासकीय कोविड सेंटरला मदत...!


देवळाली प्रवरा - दि. १८ मे 
देवळाली प्रवरा च्या शासकीय कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष्याच्या वतीने आज मदतीचा हात पुढे आला आहे.

सोसिएल मीडिया द्वारे झालेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवळाली प्रवरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला आज फळे, अंडी, चिकन आणि मटण आदी पौष्टीक आहार भेट दिला, त्याच बरोबर येथून पुढे दररोज हा आहार या शासकीय कोविड सेंटरला दिला जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण यांनी केले. 

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आमचे नेते अजित पाटील कदम, नगरसेवक शैलेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कोविड सेंटरला येथुनपुढे आवक्ष्यक ते सर्व पौष्टीक खाद्यपदार्थ पुरवठा करणार असून त्याकामी राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. 

प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब कोहकडे, देवळाली प्रवरा राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक अरुण ढुस, जगदीश ढुस, ऋषिकेश संसारे, डॉ सुनील कदम, बाळासाहेब लोखंडे, शरीफभाई शेख, सुनील विश्वसराव,  भय्या इनामदार, अविनाश लांडगे, पवार साहेब, निलेश तारडे, बाळासाहेब पांडुरंग चव्हाण, बाबासाहेब संसारे, अरुण वाळके, अमजद इनामदार व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मदतीबद्दल आभार मानले.
close