shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर महाविद्यालयात रेडिओ स्टेशन उभारणार- हर्षवर्धन पाटील*

*इंदापूर महाविद्यालयात रेडिओ स्टेशन उभारणार- हर्षवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी-
  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कमुनिटी रेडिओ स्टेशनची लवकरच स्थापना करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. 
    इंदापूर महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.अशोक पाटील, नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालय शिरसोडीच्या मुख्याध्यापिका झुंबर घाडगे, नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडीचे मुख्याध्यापक नजीर मोमीन, महात्मा फुले विद्यालय बिजवडीचे मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, प्रगती विद्यालय लोणी देवकरचे सहशिक्षक शिवाजी राजगुरू यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,'केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कम्युनिटी रेडिओ टेशन उभारणीसाठी बावीस लाख रुपयाचे अनुदान देण्यास सहमती दर्शविलेली आहे. लवकरच इंदापूर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी  रेडिओ स्टेशन उभारण्यात येईल.'
    यावेळी संस्थेचे संचालक विलास वाघमोडे, भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, मुख्याध्यापक विकास फलफले उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. आभार रामहरी लोखंडे यांनी  मानले.
close