shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथील आदर्श शिक्षक ब्रह्मदेव गवळी सर झाले सेवानिवृत्त ..!!

श्रीनाथ विद्यालय वडापुरी  येथील आदर्श शिक्षक ब्रह्मदेव गवळी सर झाले सेवानिवृत्त ..!!
 


इंदापूर प्रतिनिधी: श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ वडापुरी या संस्थेमध्ये गेली चाळीस वर्ष सेवा करीत असणारे शिक्षक ब्रह्मदेव महादेव गवळी मुक्काम पोस्ट भेड, तालुका - माढा ,जिल्हा - सोलापूर सध्या राहणार वडापुरी यांचे आज दि३१मे२०२१  रोजी सेवानिवृत्त झाले .यानिमित्त कोरोना काळ असल्याने त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या सुविद्य पत्नी ज्यांनी गवळी सरांना संसारिक जीवनामध्ये भरभरून साथ दिली त्या कै. गवळी ताई यांच्या प्रतिमेचे पूजन करून  ब्रह्मदेव गवळी सर यांचा सेवानिवृत्ती बद्दल चा सत्कार श्रीनाथ विद्यालयाचे तात्यासाहेब राजगिरे सर व संजय कांबळे सर यांनी  केला.


श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ वडापुरी ,या शिक्षण संस्थेमध्ये गेली ४० वर्षे सेवा करीत असणारे  आज दिनांक ३१.५.२०२१ सोमवार रोजी सेवा निवृत्त होत झाले. वडापुरी गावामध्ये  आल्यापासून आज  पर्यंत संस्थेमध्ये ,गावामध्ये,भरभरून त्यांना साथ मिळाली,प्रेम मिळालं, त्यांनी खूप मनापासून सेवा देण्याचा प्रयत्न केला,

त्यांचे कुटुंब ,आणि गावचे खूप जिव्हाळा चे प्रेमाचं आणि आपुलकीच संबंध आले ,आयुष्यात नोकरी ला सुरवात करताना एक कपडे ची पेटी घेऊन आलेला गवळी सर यांचे आयुष्य नाथ बाबांच्या आशीर्वादाने प्रगती करून  आनंदात ,समाधानात वडापुरी मध्ये घालवलं , 

असा सोपा सरळ संसार त्यांनी आणि गेली ४० वर्ष  जिच्या सोबतीने प्रपंच्या व शिक्षक सेवा केली  सोबतीने  आयुष्य बरोबर काढलं आणि अवघ,आनंदाचं ,निवांत मुलामध्ये नातवांमध्ये घालवायचे दिवस आले परंतु ,नियती  पुढे कोणाचं काय म्हणत गवळी ताई त्यांच्या मध्ये नाहीत त्याच दुःख न भरून येण्या  सारखं आहे .

ते कोना विधार्थ्याला मारलं असेल ओरडलो असेल ,किंवा काय चुका झाल्या असतील तर कोणता आकस न ठेवता  माफ करा मनापासून  संस्थेचा ,माझे सर्व सहकारी शिक्षक,शिक्षिका व इतर कर्मचारी  ,गावकरी मित्र परिवार  व विध्यार्थी यांचे मनापासून आभार मानतो , लिहताना काय लिहावं ,बोलताना काय बोलावं ,आभार काय मानवते ,या पलीकडे सर्वानी मला प्रेम दिल  त्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
  _________________________                                      

*आयुष्याची पाने उलटली ,
*सेवानिवृत्ती देखील झाली,
*संसाराची कर्त्यव्य संपली,
*वृत्तीदेखील निमली* 
 
 *अन निवृत्तीची सुरवात झाली.
close